पहिल्या पत्नीला फसवून दुसऱ्या लग्नासाठी नवरदेव उभा, अखेर मांडवातच समोर आलं संपूर्ण प्रकरण
प्रीतीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिचे त्याच्याशी आर्य समाज मंदिरात लग्न झालं होतं.
मुंबई : लग्न म्हटलं की, नववधू आणि नवरदेवाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. त्यादिवशी सर्वगोष्टी ठरवल्याप्रमाणे व्हाव्यात असे सगळ्यांना वाटत असते. परंतु एका लग्नात काही भलताच प्रकार घडला. येथे एका लग्नात एक महिला येऊन पोहोचली आणि ती हा नवरदेव आपला असल्याचे सांगू लागली. हे कहाणी सिनेमातील वाटत असली, तरी ती खऱ्या आयुष्यातील आहे. जो हरियाणात पोहोचला आहे. जो अखेर पोलिस्टेशनपर्यंत पोहोचला.
खरंतर हरियाणातील पलवल सेक्टर 2 जवळील एका कॉलनीत सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात, लग्न थांबवण्यासाठी एक महिला आपल्या कुटुंबासोबत आली आणि स्वत:ला त्याची बायको सांगू लागली, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.
या महिलेचं नाव प्रीती आहे. तिने या नवरदेवावर आरोप केला आहे की, दोन वर्षांपूर्वी 12 मार्च 2020 रोजी फतेहपूर बिल्लौच येथील रहिवासी रोहितसोबत तिचा विवाह झाला होता. लग्नानंतर ती महिनाभर पतीसोबत राहिली. ज्यानंतर तिला आपल्या माहिरी पाठवण्यात आले.
जेव्हा प्रितीला कळले की, तिचा नवरा पलवलमध्ये पुन्हा लग्न करत आहे. तेव्हा तिने पोलिसात तक्रार नोंदवली.
प्रीतीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिचे त्याच्याशी आर्य समाज मंदिरात लग्न झालं होतं. त्यानंतर कोर्ट मॅरेजही झाले. ज्याचा तिने पुरावा दाखवला.
यानंतर प्रीतीचा नवरा लग्न करणार असलेल्या सुनीतालाही प्रीतीचं सगळं म्हणणं पटलं, ज्यानंतर सुनिताने देखील रोहितवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. ज्यामुळे आता हा नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांची चारही बाजून कोंडी झाली आहे.