Bhadra And Budhaditya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशी परिवर्तन करतो. ग्रहांच्या या राशीबदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडताना दिसतो. नुकतंच 1 ऑक्टोबर रोजी बुध ग्रहाने गोचर केलं आहे. यामुळे दोन राजयोग तयार झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रहांचा राजकुमार बुध 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत या दोन्ही योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतोय. यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


सिंह रास (Leo Zodiac)


सिंह राशीच्या लोकांसाठी भद्र आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळू शकतात. तुम्हाला कोणत्याही नवीन योजनेत यश मिळेल. केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल. समाजात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. 


धनु रास (Dhanu Zodiac)


भद्र आणि बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. तुमच्या उपजीविकेच्या क्षेत्रात वाढ होईल. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला नवीन संधी मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांचं सहकार्य मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना या काळात प्रमोशन मिळू शकते. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


मिथुन राशीच्या लोकांसाठी भद्र आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती सकारात्मक ठरणार आहे. हे दोन्ही योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहेत. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तुम्ही वाहने आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. तुम्हाला परदेशातून आर्थिक लाभही मिळू शकतो. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )