Yearly Horoscope 2024 : अवघ्या काही दिवसांनी आपण नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. येणारं नवीन वर्ष प्रत्येकासाठी खास आहे. 2024 हे वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. अशातच ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करतो. काही राशींसाठी 2024 हे वर्ष अनलकी ठरणार आहे. त्यांना करिअर, आर्थिक आणि आरोग्याबद्दल अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. कुठल्या राशींना आगामी वर्ष संकटाचं असणार आहे, जाणून घ्या.  (yearly horoscope 2024 Unlucky zodiac signs Be careful about career money health)


'या' राशींसाठी 2024 वर्ष अनलकी!


वृषभ (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2024 हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी फार संकटाचं असणार आहे. नवीन वर्षात तुम्ही अनावश्यक खर्च होणार आहे. 1 मे 2024 पर्यंत या लोकांनी आग आणि धारदार शस्त्रांपासून दूर राहा. गुरु ग्रह या राशीच्या कुंडलीत गोचर केल्यानंतर 1 मे नंतर या राशीच्या लोकांचं आयुष्य रुळावर येण्यास सुरुवात होईल. या लोकांना लव्ह लाइफमध्ये अडचणी निर्माण होणार आहे. त्याशिवाय नवीन वर्षात तुम्हाला आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कर्मदाता शनीदेव वर्षभर तुमच्या कुंडलीतील दशम भावात असल्यामुळे तुम्हाला खूप मेहनत करण्यास भाग पाडणार आहे. पण तुम्हाला मेहनतीचं फळ लाभणार नाही. तुमच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येणार आहे. राहुमुळे तुमच्या जीवनात चढ-उतार पाहिला मिळणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांना 2024 मध्ये बुध आणि शुक्रामुळे आर्थिक गणित चुकणारा आहे. नवीन वर्षात अधिक खर्चिक ठरणार आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला महागात पडले. कार्यक्षेत्रात प्रत्येक्ष पाऊलावर तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे. आगामी वर्षात करिअरमध्ये कुठलंही शॉर्टकट मारु नका. नाही तर मोठ्या समस्याने तुम्ही घेरले जाणार आहात. वेळ प्रसंगी तुम्ही नोकरी बदलाचा निर्णयही घेऊ शकता. विद्यार्थ्यांना सुरुवातीला काही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. केतूमुळे कौटुंबिक कहल निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनात तणाव असेल. 


हेसुद्धा वाचा - Horoscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश


धनु (Sagittarius Zodiac)


येणारं वर्ष 2024 हे या राशीच्या लोकांना संकटाचा असणार आहे. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे, नाही तर नको त्या गोष्टी अंगावर ओढवून घ्याल. वाहन चालवताना काळजी घ्या, नाही तर अपघाताची शक्यता आहे. रागाच्या भरात कोणाशीही बोलणं टाळा, नाही तर आयुष्यात मोठं संकट कोसळेल. या लोकांनी नवीन वर्षात विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात नकारात्मक घटना घडणार आहेत. तर लव्ह लाइफमध्ये चढ उतार असणार आहे. आगामी वर्षात तुमचं नशीब साथ देणार नाही. गुरू तुमच्या सहाव्या भावात असल्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)