Sport News : भारत आणि बांगलादेशमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. टीम इंडियाचा फक्त पराभव झाला नाहीतर आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला असून त्यासोबत फास्टर बॉलर दीपक चहर आणि कुलदीप सेन यांनाही दुखापत झाली आहे. क्रिकेट जगतात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11 खेळाडी दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. यामधील काही खेळाडूंना तर थेट रूग्णालयात दाखल करावं लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका चालू आहे. अॅडलेड कसोटीतील पदार्पण करणारा मार्कीनो मिंडलेने अवघी दोन षटके टाकलीत. मात्र हॅमस्ट्रिंगमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. यांच्यासह वेस्ट इंडिजचे केमार रोच, जेडेन सील्स, काइल मायर्स आणि  ब्रोनर हे आधीच दुखापतग्रस्त आहेत. यजमान ऑस्ट्रेलियालाही दुखापतीने सोडलं नाही, कर्णधार पॅट कमिन्सला आधीच दुखापत झाली असताना जोश हेझलवूड दुखापतीमुळे पहिल्या कसोटीच्या अंतिम 11 मध्ये स्थान मिळवू शकला नाही.  


लंका प्रीमिअर लीगमध्ये श्रीलंकेच्या चामिरा करूणारत्नेला सर्वात मोठी दुखापत झाली. कॅच घेताना त्याच्या तोंडावर चेंडू आदळला आणि त्याचे 4 दात पडले. चामिराला थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तो लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांमधून बाहेर आहे.


दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 11 खेळाडूंना दुखापत झाल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. खेळ म्हटल्यावर दुखापती आल्या मात्र 1 दोन नाहीतर 11 खेळाडूंना दुखापत झाल्याने कालचा बुधवार सर्व क्रिकेट रसिकांच्या मनात राहणारा दिवस असणार आहे.