मुंबई : सध्या देशभरातील आणि जगाच्या नजरा आयसीसी क्रिकेट विश्वचषकावर खिळल्या आहेत. 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाळेच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उत्कृष्ट सामना झाला ज्यामध्ये विराटच्या बॅटिंगने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. या सामन्यात विराट कोहलीने 95 धावा केल्यानंतर त्याची विकेट गेली असली तरी, सर्वजण त्याच्या फलंदाजीचे फॅन्स झाले आहेत. गौतम गंभीरनेही त्याचं कौतुक केलं आहे.  नुकतंच गौतमने एक विधान केलं आहे. ज्यामुळे विराट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  वर्ल्डकपचं प्रसारण करणाऱ्या टीव्ही चॅनलला त्याने हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला, 'विराट कोहली कमाल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्यापेक्षा चांगला फिनिशर सध्या कोणी नाही. फिनिशर तो नाही जो 5 किंवा 7 व्या क्रमांकावर उतरतो. विराट हा चेज-मास्टर आहे. पण कोहलीचे चाहते फक्त क्रिकेटप्रेमीच नाहीत तर चित्रपट प्रेमी देखील आहेत आणि इतकंच नाही तर अनेक अभिनेत्री देखील त्याचे चाहते आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला एका दाक्षिणात्य अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिला विराट प्रचंड आवडतो.


आम्ही बोलत आहोत साऊथ स्टार  अभिनेत्री वर्षा बोलम्माविषयी. जी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्वाती मुथ्यम या सिनेमामध्ये शेवटची दिसली होती. अभिनेत्रीने एकदा तिच्या ट्विटमध्ये खुलासा केला होता की, तिला लहानपणापासूनच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर सेलिब्रिटी क्रश आहे. आणि तिला तो खूप आवडतो.


'जवान' फेम एटली दिग्दर्शित बिगिलमध्ये, अभिनेत्रीने गायत्री सुदर्शन नावाच्या महिला फुटबॉलरची भूमिका साकारली होती ज्यामध्ये मनोरंजक गोष्ट म्हणजे तिचा जर्सी क्रमांक 18 आहे.तिने चित्रपटात परिधान केलेल्या १८ क्रमांकाच्या जर्सीमागे कोहलीवरील तिचे प्रेम असल्याचेही या अभिनेत्रीने उघड केलं आहे. 2019 मध्ये रिलीज झालेला बिगिल हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता जो तमिळ प्रेक्षकांना खूप आवडला होता. वर्षा बोलम्माचा बिगिल हा चित्रपट 180 कोटी रुपयांमध्ये बनवला गेला होता आणि बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचे कलेक्शन होतं. अभिनेत्रीने क्रिकेटरचे पेपर कटिंग आणि सहावीत शिकत असताना तिने डिझाइन केलेल्या जर्सीचे स्केच देखील पोस्ट केलं होतं.


2015 च्या तमिळ चित्रपट सथुरनमधून पदार्पण करणारी अभिनेत्री, विजय सेतुपती आणि त्रिशा यांच्या भूमिका असलेल्या 96 चित्रपटातील तिच्या अभिनयानंतर तिला खरी ओळख मिळाली. वर्षाने तिच्या डबस्मॅश व्हिडिओंद्वारे लोकप्रियता मिळवली आणि नंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.