केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मागील 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या सिरीजचा आज शेवटचा सामना आहे. न्यू लँड्समध्ये हा सामना रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज येथे अनेक रेकॉर्ड्स बनण्याची शक्यता आहे. टीम इंडियाजवळ आज एकाच दौऱ्यात 2 सीरीज जिंकण्य़ाची संधी आहे. वनडे सीरीजवर 5-1 ने विजय मिळवल्यानंतर 3 टी-20 पैकी 1 सामना भारताने तर 1 आफ्रिकेने जिंकला आहे. आज जो संघ विजयी होईल तो संघ सीरीजपण जिंकेल.


विराट कोहली


आज जर कोहली 17 रन करतो तर मार्टिन गुप्टिल आणि ब्रँडन मॅक्युलम यांच्यानंतर तो टी-20 मध्ये 2000 रन करणारा तिसरा खेळाडू ठरेल.


एम.एस धोनी


धोनी जर आज मॅचमध्ये चार स्टंपिंग करतो तर टी-20 मध्ये सर्वाधिक स्टंपिंग करणारा विकेटकीपर तो बनेल, धोनी पेक्षा जास्त स्टंपिंगचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या  कामरान अकमलच्या नावावर आहे. त्याने 32 स्टंपिंग केले आहेत. धोनी तीन स्टंपिंगसह त्याची बरोबरी करेल.


रोहित शर्मा


रोहित शर्माकडे देखील आज रेकॉर्ड बनवण्याची संधी आहे. रोहित आज शाहिद आफ्रिदी आणि युवराज सिंगचा 73-73 सिक्सचा रेकॉर्ड मोडू शकतो. रोहितच्या खात्यात 72 सामन्यांमध्ये 69 सिक्सची नोंद आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 103 सिक्स ठोकले आहेत. 102 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्य़ा मार्टिन गुप्टीलच्या नावावर आहे.