मुंबईच्या पराभवानंतर या 3 संघांना झाला मोठा फायदा
मुंबईच्या पराभवानंतर झाला कोणाकोणाला फायदा
बंगळुरु : बंगळुरुने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 31व्या सामन्यात मुंबईचा 14 रनने पराभव केला. प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही सेमीफायनल सारखी मॅच होती. या सामन्यातील पराभवानंतर संघ आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर होणार होता. त्यामुळे दोघांनी हा सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. बंगळुरुने याआधी बॅटींग करत सात विकेटवर 167 रन केले होते. मुंबईने 20 ओव्हरमध्ये सात विकेट गमवत फक्त 153 रन केले. ज्यामुळे मुंबईला 14 रनने पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई आता जवळपास या स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
मुंबईने टॉस जिंकत बंगळुरुला बटींगसाठी आमंत्रित केलं होतं. वोहराने 45 रन, मॅक्कुलमने 37 रन तर विराट कोहलीने 32 रन आणि ग्रँडहोमने 23 रन करत मुंबईसमोर 167 रनचं आव्हान ठेवलं. मुंबईकडून ईशान किशन, यादव, रोहित शर्मा, पोलार्ड यासारखे खेळाडू काही खास कामगिरी करु शकले नाही. फक्त ड्युमिनीने 23 रन आणि हार्दिक पंड्याने 50 रनची खेळी केली.
मुंबईच्या पराभवाने कोणाचा फायदा
मुंबईच्या पराभवानंतर आता याचा फायदा कोलकाता, बंगळुरु आणि राज्यस्थानला झाला आहे. कोलकाता 8 गुणांसह चौथ्या तर बंगळुरु 6 गुणांसह पाचव्या आणि राज्यस्थान देखील 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मुंबई आणि दिल्ली आयपीएल स्पर्धेतून जवळपास बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता चौथ्या स्थानासाठी 3 संघांमध्ये टक्कर असणार आहे.