स्पोर्ट्सच्या 4 महत्त्वाच्या बातम्या
स्पोर्ट्स संबंधित 4 महत्त्वाच्या बातम्या
1. फ्रान्सनं फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. फ्रान्सनं उरुग्वेच 2-0 नं पराभव करत उपांत्य फेरीचा आपला प्रवेश निश्चित केला. तर या पराभवामुळे उरुग्वेचं फुटबॉल विश्वचषकातील आव्हानं संपुष्टात आलं. उरुग्वेकडून दुखापतीमुळे बाद फेरीचा हिरो कवानी या सामन्यात खेळू शकला नाही. आणि याचा मोठा फटका बसला. उरुग्वेचा बचाव यशस्वीपणे भेदण्यात या सामन्यात फ्रान्सला यश आलं.
2. यजमान रशियाचा उपांत्यपूर्व फेरीत आज क्रोएशियाशी सामना आहे. उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी दोन्ही संघात चुरशीचा सामना आज पाहायला मिळणार आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्यात.
3. फिफा विश्वचषकात आज इंग्लंड आणि स्वीडनमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाची या विश्वचषकात चांगली कामगिरी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
4. कार्डिकमधील दूसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडनं भारताला ५ गडी राखून नमवलं. भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी १४९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अॅलेक्स हेल्सच्या वादळी खेळीमुळे इंग्लंडला हे लक्ष्य गाठता आलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडचा विजयाचा मार्ग सुकर झाला. या विजयासह इंग्लंडनं मालिकेत १-१ ची बरोबरी केली आहे. त्यामुळे पुढचा सामना मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे.