IPL मध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट झालेले 5 खेळाडू
12 वर्षाच्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट झाले हे ५ भारतीय खेळाडू
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यावर्षी संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) मैदानावर आयोजित केले जात आहे. 12 वर्षाच्या आयपीएलच्या इतिहासात अनेक विक्रम नोंदविण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत या १२ वर्षांत अशी काही विक्रमं नोंदवली गेली आहेत, जी कोणत्याही खेळाडूला पुन्हा घडू नये अशी वाटणारी देखील आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंबद्दल बोलणार आहोत.
१. हरभजन सिंग
या यादीमध्ये भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगचे नाव अव्वल स्थानी आहे. भज्जी आयपीएल कारकिर्दीत 13 वेळा शून्यावर बाद झाला होता. जे इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा जास्त आहे. हरभजन सिंगने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 2 शतके ठोकली आहेत.
२. पार्थिव पटेल
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद झालेल्या खेळाडूंच्या यादीत भारताचा सर्वात युवा यष्टीरक्षक पार्थिव पटेल दुसर्या क्रमांकावर आहे. या प्रकरणात पार्थिव हरभजन सिंगच्या बरोबरीवर आहे. आयपीएलमध्ये पार्थिव पटेल 13 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.
३. पियुष चावला
लेगस्पिनर पियुष चावला देखील या यादीमध्ये येतो. आयपीएलमध्ये 12 वेळा तो शुन्यावर आऊट झाला आहे.
४. मनीष पांडे
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी आयपीएलच्या मेगास्टारच्या यादीत आहे. परंतु या लीगमध्ये मनीषचे नाव देखील बऱ्याच वेळा शुन्यावर आऊट होणाऱ्यांच्या यादीत आहे. आयपीएल कारकीर्दीत खाते न उघडताही मनीष पांडे १२ वेळा शुन्यावर आऊट झाला आहे. मनीष पांडेने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
५. अंबाती रायुडू
आयपीएलच्या या नको असलेल्या यादीत आणखी एक नाव येतं ते म्हणजे टीम इंडियाचा फलंदाज अंबाती रायुडू यांचं. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट झालेल्या यादीत मनीष पांडे आणि पार्थिव पटेलनंतर अंबाती रायुडू हा तिसरा फलंदाज आहे. रायडू देखील 12 वेळा शुन्यावर आऊट झाला आहे.