शतकांच्या अर्धशतकासाठी फार वेळ लागला नाही : विराट कोहली
विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे अर्धशत पूर्ण करण्याची कामगिरी रविवारी पार पाडली. आपल्या या कामगिरीबद्धल बोलताना `आपण खेळाकडे लक्ष देतो. शतकांकडे नाही. आपल्याला ही कामगिरी पार पाडताना फार वेळ लागला नाही`, असे म्हटले आहे.
कोलकाता : विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे अर्धशत पूर्ण करण्याची कामगिरी रविवारी पार पाडली. आपल्या या कामगिरीबद्धल बोलताना 'आपण खेळाकडे लक्ष देतो. शतकांकडे नाही. आपल्याला ही कामगिरी पार पाडताना फार वेळ लागला नाही', असे म्हटले आहे.
क्रिकेट खेळेपर्यंत माझा हाच विचार राहिल..
विराटने श्रीलंकेविरूद्ध झालेल्या पहिल्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी शतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटचे हे 18वे शतक आहे. तर, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 50वे. आपल्या कामगिरीबद्धल बोलताना विराट म्हणतो, शतकांची संख्या मोजण्यापेक्षा आपला खेळ अधिक सुधारण्यावर लक्ष देणे मला आवडेल. मी क्रिकेट जोपर्यंत खेळत आहे. तोपर्यंत माझा हाच विचार राहील असेही कोहलीने म्हटले आहे.
शेवटच्या टप्प्यात मनात काय होते...?
कोहलीला विचारण्यात आले की, समना शेवटच्या टप्प्यात असताना कप्तान म्हणून तुझ्या मनात काय होते? या प्रश्नावर बोलताना, 'पावसामुळे सामना स्थगित ठेवावा लागला. यात बराच वेळ गेला. तरीही संघातील सर्व खेळाडूंनी चांगला उत्साह दाखवला. त्यामुळे मी खूप खूष आहे', असे विराट म्हणाला.
मैदानवर खेळताना मानसिक स्थिती मजबूत हवी
गेल्या पाच दिवसात परिस्थिती खूप बदलली. आम्हाला खूप कमी वेळात बरेच काही करायचे होते. आमचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता. तुम्ही जर मानसिक रूपाने मजबूत नसाल तर, मैदानावर टिकून राहणे कठीण होते, असे सांगतानाच आपण मैदानावर असताना पूर्ण लक्ष खेळाकडेच देतो. मी शतकं मोजत बसत नाही, असेही विराट म्हणाला.