`Little Dhoni` पाहिलात का? 6 वर्षांच्या चिमुकल्याने मारले Helicopter Shot, व्हिडीओ
टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई: काही दिवसांपूर्वी एक 9 वर्षांच्या मुलाचा स्टम्पने तुफान फलंदाजी करताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता 6 वर्षांच्या चिमुकल्याचा जबरदस्त क्रिकेट खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल धोनीच्या फलंदाजीची कॉपी करताना हा चिमुकला दिसत आहे. त्याच्या फलंदाजीचं सोशल मीडियावर खूप कौतुक देखील होत आहे.
टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जेव्हा युवा क्रिकेट फॅन्स पायलट व्हायचं असल्याचं म्हणतात त्याचा अर्थ हा असतो असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 38 हजारहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.
या व्हिडीओमध्ये छोटू महेंद्रसिंह धोनीचा सर्वात प्रसिद्ध असलेला हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसत आहे. आकाश चोपडा यांनी आपल्या कमेंन्ट्रीने या व्हिडीओमध्ये आणखी रंगत आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.