MS Dhoni : धोनीला नेमका कशामुळे राग येतो? चाहत्याच्या प्रश्नावर कॅप्टन कूल स्पष्टच म्हणाला...
MS Dhoni On Anger : खऱ्या आयुष्यात देखील धोनी इतकाच कुल आहे का? धोनीला कधी राग येत नसले का? या मिलियन डॉलरच्या प्रश्नाचं उत्तर खुद्द धोनीने दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.
MS Dhoni Viral Video : जसा तो संघात आला तसं त्याला कोणीही रागात पाहिलं नाही. मैदान असो वा ड्रेसिंग रूम... तो नेहमी कुल असायचा. तुम्हाला माहितच असेल आपण कोणाविषयी बोलतोय... होय महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni). धोनीने अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली. अनेक क्रिकेटचे रेकॉर्ड्स मोडले. कधी त्याची हेअर स्टाईल चर्चेत राहिली तर कधी त्याची विकेटकिपिंग.. धोनीने (Mahendra Singh Dhoni) जवळपास 15 वर्षे सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलंय पण फारच क्वचितच तो आपल्या संघातील कोणत्याही खेळाडूवर किंवा प्रतिस्पर्ध्यावर रागावलेला किंवा नाराज होताना दिसला. धोनीच्या याच कुलनेसवर (Captain Cool) अनेकदा चर्चा झाल्या. त्यामुळे त्याची फॅनफॉलोविंग देखील मोठ्या प्रमाणात आहे.
मात्र, खऱ्या आयुष्यात देखील धोनी इतकाच कुल आहे का? धोनीला कधी राग येत नसले का? असे प्रश्न अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतात. अशातच आता या मिलियन डॉलरच्या प्रश्नाचं उत्तर खुद्द धोनीने दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी त्याच्या नव्या हेअर स्टाईलमध्ये दिसतोय. त्याचबरोबर धोनी काळ्या कपड्यांमध्ये लहान मुलांसमोर उभा असलेला दिसत आहे. ज्याप्रकारे धोनी विकेट्सच्या मागे उभा रहायला तसाच धोनी खुर्चीच्या मागे उभा राहून चिमुकल्यांच्या प्रश्नाची उत्तरं दितोय.
आप कप्तान मस्त है लेकीन आपको क्या गुस्सा दिलाता है? असा सवाल एका लहान चिमुकल्याने धोनीला विचारला. माझी पत्नी मला खूप लवकर राग येण्यास भाग पाडते. तिच्यात हे विशेष वैशिष्ट्य आहे. माझ्या संयमाची पातळी सामान्यतः उच्च असते, परंतु ती एका झटक्याने कमी करते, असं धोनीने म्हटलं आहे. धोनीच्या या उत्तराने अनेकांना हसू आवरलं नाही. त्यावर एका चाहत्याने धोनीला प्रश्न विचारला. मग लग्न करू नये का? या प्रश्नावर धोनी कधीच करू नये, असं धोनी स्पष्टच म्हणाला आहे.
धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने तीनही आयसीसी व्हाईट-बॉल ट्रॉफी जिंकल्या. त्यामुळेच त्याला यशस्वी कर्णधार देखील म्हटलं जातं. धोनीने जुलै 2010 मध्ये साक्षीसोबत लग्न केले आणि 2015 मध्ये या जोडप्याला झिवा नावाची मुलगी झाली. 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फॅमिलीसोबत वेळ घालवतोय. अनेकदा धोनी वेगवेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतो. तर कधी तो आपल्या गाड्यांसह धूम ठोकताना दिसतोय.