मुंबई : कोणत्याही युवा खेळाडूसाठी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवणे किती कठीण असते हे सांगण्याची गरज नाही. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या देशाच्या राष्ट्रीय संघात खेळणे सोपे नाही. असं मत दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने याने व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या पॉडकास्टमध्ये बोलताना डिव्हिलियर्सने हे मत मांडलंय. जर त्याचा जन्म भारतात झाला असता तर कदाचित तो राष्ट्रीय संघात खेळू शकला नसता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हे त्याचे स्वप्न राहिले असते. असं त्याने म्हटलं आहे. 'भारतीय खेळाडूंचा अधिक आदर केला पाहिजे, कारण टीम इंडियामध्ये स्थान मिळवणे सोपे नाही.'


टीम इंडियात खेळण्यासाठी स्पेशल असणे आवश्यक


डिव्हिलियर्स म्हणाला की, 'मी गेल्या 15 वर्षांपासून आयपीएल क्रिकेट, भारतीय प्रेक्षक आणि भारतीय लोकांची काम करण्याची पद्धत अनुभवण्यासाठी आलो आहे. हे माझे नशीब आहे. साहजिकच भारतात जन्म घेणे आणि मोठे होणे मनोरंजक आहे. कुणास ठाऊक माझा जन्म भारतात झाला असता तर कदाचित मी राष्ट्रीय संघात खेळलो नसतो. भारतीय संघात स्थान मिळवणे खूप कठीण काम आहे. यासाठी तुम्हाला खास खेळाडू असायला हवे.'


एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत 184 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 39.70 च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरनंतर तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. डीव्हिलियर्स पहिल्या IPL म्हणजेच 2008 च्या मोसमापासून खेळत आहे. यावेळी डीव्हिलियर्सला आरसीबी संघाने सोडले आहे. पुढील मोसमात तो नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो.


सर्वाधिक कमाईच्या बाबतीत टॉप-5 मध्ये एबी डिव्हिलियर्स हा एकमेव परदेशी खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने या स्पर्धेतून आतापर्यंत 102 कोटी, 51 लाख, 65 हजार रुपये कमावले आहेत.