नवी दिल्ली :  जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी धक्कादायक बातमी.... माजी बांगलादेशी क्रिकेटर अब्दूर रज्जाक आणि त्याचे कुटुंबीय रस्ते अपघातात जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढाका ट्रिब्यून डॉट कॉमने दिलेल्या बातमीनुसार ढाक्याच्या दिशेने येत असताना गोपीगंज जिल्ह्यातील कशानी भागात अपघात झाला. बागेरहाट येथे ईद उल फित्र साजरी करून ढाक्याकडे येत असताना अब्दूर रज्जाक अपघातग्रस्त झाला. 


रज्जाक ढाका-खुलना हायवेवर जात असताना त्याच्या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे रस्त्याचा बाहेर आदळली.  रज्जाक याची पत्नी इशरत जहाँ ओनी, दोन वर्षाचा मुलगा आदिन, त्याची बहिण आणि दोन पुतण्या कारमध्ये होत्या. 


माजी बांगलादेशी कर्णधार मुशफीकूर रहीम याने सोशल मीडियावर या अपघाताची माहिती दिली.  आपले रज्जाक भाईला अपघात झाला आहे. त्याच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असा मेसेज रहिमने टाकला आहे. 


रज्जाक याने बांगलादेशकडून १५३ वन डे आणि ३४ टी-२०  खेळल्या आहेत. वन डेमध्ये २०० विकेट घेणारा तो पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे.  गोलंदाजीसोबत त्याची सर्वात फास्ट अर्धशतकासाठी तो ओळखला जातो. त्याने बांगलादेशकडून खेळताना ५ मे २०१३ मध्ये झिम्बाब्वे विरोधात शानदार अर्धशतक झळकावले होते.