मुंबई : भारतीय संघातून खेळलेला कर्नाटकचा जलद गोलंदाज अभिमन्यु मिथुन अचानक फर्स्ट क्लास क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. मिथुनने 2010 मध्ये भारताच्या संघातून टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. त्याचा भारतीय क्रिकेट टीमधील करिअर थोड्या काळासाठीच होतं. मात्र तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खूप काळापासून होता. 


भारतीय नॅशनल संघाकडून फक्त 9 सामने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिमन्यू मिथुनने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 4 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 9 विकेट्स घेतल्या. त्याने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. मिथुन प्रथम श्रेणी आणि सूची अ मध्ये बरेच सामने खेळले. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 103 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 338 विकेट्स घेतल्या. लिस्ट ए आणि टी -20 सामन्यांमध्ये त्याच्या 205 विकेट्स आहेत.


देशाचं प्रतिनिधीत्व करणं माझ्यासाठी अभिमानासाप्द 


निवृत्त झाल्यावर मिथुन म्हणाला की, मी माझ्या देशासाठी खेळलो, ही माझ्यासाठी सर्वात मोठी कामगिरी आहे. मला मिळालेला आनंद मी नेहमी लक्षात ठेवेन. तो म्हणाले की मी माझे भविष्य आणि कुटुंब पाहून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्ये भरपूर तरुण वेगवान गोलंदाज आहेत. मी योग्यवेळी निवृत्त झाली घेतली तर इतरांना संधी मिळेल. 


डिस्कर थ्रोअरमधून बनला क्रिकेटर 


अभिमन्यू मिथुन हा पहिले डिस्कस थ्रोअर होता. पण त्यानंतर त्यांने क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्याने क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये. काही महिन्यांनंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पणही केले. पण तो जास्त काळ खेळला नाही. आयपीएलमध्येही मिथुनने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी एकूण 16 सामने खेळले आहेत.