IPL: अहो आश्चर्यम! शर्माने एकाच डावात दोन वेळा ठोकलं अर्धशतक, पहा नेमकं कसं
अभिषेक शर्माने अर्धशतक केलं त्यावेळी वेगळीच घटना पहायला मिळाली.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर सनरायझर्स हैदराबादला सूर गवसला. हैदराबादने त्यांचा पहिला विजय नोंदवला आहे. भिषेक शर्मा हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला. अभिषेकने 50 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्ससह 75 रन्सची जबरदस्त खेळी करत टीमला विजय मिळवून दिला.
मात्र ज्यावेळी अभिषेक शर्माने अर्धशतक केलं त्यावेळी वेगळीच घटना पहायला मिळाली. ते म्हणजे, अभिषेक शर्माने एकाच डावात दोन वेळा अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी स्टेडियममधील चाहतेही गोंधळले होते. मात्र संपूर्ण घटना समजून घेतल्यानंतर नेमकी बाब त्यांच्या लक्षात आली.
तर झालं असं की, हैदराबाद खेळत असताना 12 व्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने धावत 2 रन्स काढले. त्यावेळी तो 48 रन्सवर खेळत होता. यावेळी त्याने अर्धशतक झाल्याचा आनंद व्यक्त केला. शिवाय हैदराबादच्या खेळाडूंनीही टाळ्या वाजवल्या.
दरम्यान यानंतर तातडीने रिप्ले दाखवण्यात आला आणि तेव्हा समजलं की अभिषेकने घेतलेला तो शॉर्ट रन होता. म्हणजेच अभिषेकने रन पूर्ण केला नव्हता. त्याने क्रीजच्या बाहेरूनच बॅट उचलली होती. त्यामुळे त्याला शॉर्न रन म्हटलं गेलं. अशा स्थितीत अभिषेक शर्माला पुढच्याच बॉलला पुन्हा रन काढून अर्धशतक पूर्ण करावं लागलं. पुढच्याच चेंडूवर अभिषेक शर्माने एक रन करत पुन्हा एकदा हवेत बॅट फिरवून अर्धशतकाचा आनंद साजरा केला.
कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 15 व्या मोसमातील सलग चौथा पराभव झाला. सनरायजर्स हैदराबादने सीएसकेवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 155 रन्सचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 17.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.