नवी दिल्ली : ऑलिम्पिक खेळांमध्ये दमदार कामगिरी करत भारतासाठी रौप्य पदकाची कामगिरी करणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर तिच्यावर अनेक बक्षीसांचा वर्षावही करण्यात आला. स्वागत सोहळ्याची धामधुम सुरु असतानाच मीराबाईनं तिचं घर गाठलं आणि त्या क्षणांची छायाचित्र पाहून अनेक नजरा तिच्यावर खिळल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरील फोटोमध्ये मीराबाई तिच्या मणिपूर येथील घरी जमिनीवरच बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे. तिचा हाच फोटो पाहून 'रहना है तेरे दिल मे' फेम अभिनेता आर. माधवन यानं त्यावर एक अनपेक्षित प्रतिक्रिया दिली आहे. 


'हे सारं खरंच असू शकत नाही. मलातर काही शब्दच सुचत नहीयेत... ', अशा शब्दात माधवन तिच्या फोटोंवर व्यक्त झाला. मीराबाईचं हे साधं राहणीमान आणि एका ध्येय्यप्राप्तीसाठी तिनं केलेली कामगिरी पाहता ती खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.


'पदक जिंकल्यावरच आम्ही भारतीय नाहीतर, चिनी, चिंकी, नेपाळी'; मिलिंद सोमणच्या पत्नीचा संताप


दरम्यान सध्याच्या घडीला विविध क्षेत्रांतून मीराबाई चानू हिला शुभेच्छा देण्यासोबतच अनेक बक्षीसंही दिली जात आहेत. त्यातच आता खऱ्या अर्थानं मीराबाईला आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. कारण, तिची थेट अतिरिक्त पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं तिच्या जीवनाला आता खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.