गुवाहाटी : स्टंपिंग करताना धोनीची हात चलाखी आणि चपळता प्रत्येकवेळी दिसून आली आहे. जगभरातल्या दिग्गज बॅट्समन धोनीच्या चपळतेचे शिकार झाले आहेत. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी 20मध्ये धोनीला त्याच्याच अंदाजामध्ये आऊट व्हावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍडम झम्पाच्या बॉलिंगवर टीम पेननं धोनीला स्टंपिंग केलं. टी-20मध्ये धोनी पहिल्यांदाच स्टंपिंग आऊट झाला आहे. ३०६ वनडे खेळणारा धोनी २०११च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये असाच आऊट झाला होता. तर ९० टेस्ट मॅचमध्ये धोनी तीन वेळा स्टंपिंग आऊट झाला आहे. २००६ साली पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये, २००८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये आणि २०१० साली बांग्लादेशविरुद्धच्या टेस्टमध्ये धोनी स्टंपिंग आऊट झाला होता.