Mankading rule : नॉन स्ट्रायकर (non-striker's end) एंडवरून रन आऊट (Run Out) करण्याच्या मंकडिंग प्रक्रियेवरून (Mankading) नेहमी वाद होत असल्याचं दिसून आलंय. काही खेळाडू यांना योग्य मानतात तर काहींना ही पद्धत चुकीची वाटते. अनेकदा यामध्ये प्रेक्षकांची देखील गफलत होताना दिसते की, अशा परिस्थितीत फलंदाज आऊट आहे की नाही. यासाठीच मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने हे सरळ शब्दात सांगण्यासाठी शब्दांमध्ये काही बदल केले आहेत.  


माकंडिंगसंदर्भात MCC ने शब्दावलीत केले बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांकडिंग (Mankading) वरून नेहमी वाद झालेला पहायला मिळतो. नुकतंच बिग बॅश लीगमध्ये एडम झम्पाच्या घटनेनंतर मेरिलबोन क्रिकेट क्लबने शब्दावलीमध्ये काही बदल केले आहेत. 


झालं असं की, एडम झम्पाने फॉलो थ्रू पूर्ण केल्यानंतर मॅकेंजी हार्वेला बॉल टाकणारच होता, तितक्यात तो उलटा फिरला आणि त्याने विकेट्स उडवल्या. मात्र अंपायरने झम्पाच्या अपीलला टीव्ही अंपायरकडे पाठवून दिलं. यामध्ये थर्ड अंपायरने नॉट आऊट करार दिला. याला कारण देताना अंपायरने सांगितलं की, बॉल टाकण्याच्या वेळी झाम्पाचा हात अधिक 'वर्टिकली' गेला. 


कन्फ्युजन दूर करण्यासाठी नियमात जोडली ही बाब


एमसीसीने असंही म्हटलंय की, नियमाच्या शब्दांमुळे काही शंका निर्माण झाल्या असतील. त्यामुळे आता नियम 38.3 चे शब्द काहीसे बदलण्यात आलेत. यानुसार आता नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या फलंदाजाला रनआऊट करण्याच्या बाबतीत कोणताही गोंधळ उडणार नाही.


यापूर्वी नॉन स्ट्रायकरने बॉल टाकण्याच्या अपेक्षित वेळेआधी क्रीज सोडलं तर कोणत्याही वेळी रनआऊट होऊ शकतं असं नियमात म्हटलं होतं. त्यानुसार याचा अर्थ गोलंदाजाची बॉल टाकण्याची अॅक्शन पूर्ण झाल्यानंतरही असा नव्हता, असंही एमसीसीने स्पष्टीकरण दिलंय. 


नियमातील शब्दात बदल केल्यानतंर आता, गोलंदाजाने बॉल टाकणं अपेक्षित असतं आणि त्या क्षणाच्या आधी जर नॉन स्ट्रायकरने क्रीज सोडलं आणि गोलंदांज त्या पॉइंटला पोहचला तर नॉन स्ट्रायकर, नियमानुसार बाद ठरत नाही.