IND vs PAK Asia Cup 2022 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. या विजयासोबत भारताने गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकामधील पराभवाचा बदलाही घेतला आहे. पाकिस्तानने विजयासाठी भारतासमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ravindra jadeja आणि hardik pandyaच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने हे 5 विकेट्स राखत हे आव्हान पार केलं.


पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली, पहिल्यात षटकामध्ये के. एल. राहुल शून्यावर बाद झाला. पाकिस्तानचा पदार्पणवीर नसीमने राहुलला क्लीन बोल्ड केलं.


त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भागीदारी फार वेळ टिकली नाही.


रोहित 12 तर विराट 35 धावांवर बाद झाले. चौथ्या क्रमांकावर आलेला सूर्यकुमार यादवही नसीमच्या जाळ्यात फसला, नसीमने सूर्याची 18 धावांवर असतावा दांडी गुल केली. विजयाच्या उंबरठ्यावर असताना जडेजा 35 धावांवर बाद झाला.


पांड्याने सिक्स मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॅच जिंकल्यानंतर सगळीकडून त्याच कौतुक होऊ लागलं, सर्वानी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आणि प्रशंसा केली पण एक असा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय


ज्यात अफगाणिस्तानमधील एका तरुणाने हार्दिक पंड्याने सिक्स मारताच टीव्हीवरचा त्याला किस केलं आणि आनंद व्यक्त केला. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा आहे.