दुबई : अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान (Rashid Khan)याने त्याच्या देशाच्या टीममध्ये आणि खेळाडूंमध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता असल्याचं म्हटलं आहे. 2 वर्षापूर्वी भारताच्या विरुद्ध टेस्टमध्ये डेब्यू करणारी टीम तेव्हा 2 दिवसात पराभूक झाली होती. अफगाणिस्तानचा एक इनिंग आणि 262 रनने पराभव झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानचा यशस्वी खेळाडू राशिद खानने म्हटलं की, सध्या टीमची जी इच्छा आहे आणि देशातील लोकांना जे वाटतंय त्यानुसार मला वाटतं की, आमचं लक्ष्य टी-20 वर्ल्डकप जिंकणं हे आहे.' लेग स्पिनर राशिद खानने भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या 'डीआरएस विद ऐश' कार्यक्रमात म्हटलं की, 'आमच्याकडे सगळे कौशल्य आणि क्षमता आहेत. फक्त आम्हाला आमचा विश्वास वाढवावा लागेल की, आम्ही हे करु शकतो.'


'पहिल्या टेस्टमध्ये आमचा पराभव झाला. पण मोठ्या टीमविरुद्ध आम्हाला अनुभव नव्हता. मोठ्या टीम विरुद्ध खेळण्याची संधी नाही मिळाली.'


'जेव्हा आम्ही पहिला टेस्ट सामना खेळत होतो. तेव्हा आम्हाला माहित होतं की, आम्ही काय करत आहोत. प्रत्येकाचं लक्ष्य पहिला सामना, पहिला रन, पहिला सिक्स सारख्या गोष्टींवर होतं. आमचे खेळाडू टी-20 साठी जानले जातात. माझं आणि माझ्या देशाचं एकच स्वप्न आहे की, एक दिवस आम्ही टी-20 वर्ल्डकप जिंकणार. अफगाणिस्तान क्रिकेट आणि आमच्यासाठी हे सर्वात मोठं यश असेल.' असं देखील राशिद खानने म्हटलं आहे.