नवी दिल्ली :  अफगाणिस्तान टीमचा स्टार स्पिनर राशिद खान आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर वन डे रँकिंगमध्ये क्रमांक १ चे स्थान पटकावले आहे. पण पहिला क्रमांक त्याला भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहसोबत शेअर करावा लागत आहे. झिम्बाव्बे विरूद्ध सिरीजमध्ये त्याने १६ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोघांची रेटिंग सध्या ७८७ अंक आहेत. यासोबत राशिद खानने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केले आहे. 
 
 राशिद खान हा सर्वात कमी वयाचा क्रिकेटर बनला आहे. राशिद खान याचे वय १९ वर्ष आणि १५२ दिवस आहे. त्याने इतक्या कमी वयात पहिला स्थान पटकावले आहे. या पूर्वी ही किमया पाकिस्तानचा क्रिकेटर सकलेन मुश्ताक यान केली होती. सकलेन २१ वर्ष आणि १३ दिवसांचा असताना जगातील क्रमांक एकचा गोलंदाज बनला होता. 
 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशिद खानने आपल्या अखेरच्या १० सामन्यात ७.७६ च्या सरासरीने ३३ विकेट घेतल्या आहेत. यात त्याने प्रत्येक डावात किमान दोन बळी घेतले. द्विपक्षीय सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत रशिद खान तिसऱ्या स्थानावर येऊन पोहचला आहे. याबाबतीत अमित मिश्रा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २०१३ मध्ये झिम्बाव्बे विरूद्ध १८ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर कुलदीप यादव याने सध्या सुरू असलेल्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन डेमध्ये १७ विकेट घेतल्या आहेत. रशिद खान तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने झिम्बाब्वे विरूद्ध १६ विकेट घेतल्या आहेत.