अर्जुन तेंडुलकरनंतर आता विरेंद्र सेहवागचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा तगडा बॅटर; पाहा Video
Virender Sehwag Son Viral Video: इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विरेंद्र सेहवागचा (Aaryavir Sehwag) मुलगा आर्यवीर सेहवाग त्याच्या वडिलांप्रमाणे फलंदाजी करत आहे. आर्यवीर सेहवागही वडिलांप्रमाणे क्रिकेट खेळायला शिकला आहे.
Aaryavir Virender Sehwag: क्रिकेटच्या देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडूलकर याच्या मुलाने म्हणजेच अर्जून तेंडूलकर याने यंदाच्या आयपीएल सामन्यात डेब्यू केला. मुंबई इंडियन्सकडून अर्जुनने (Arjun Tendulkar) केवळ 4 सामने खेळले असून या सामन्यामध्ये अर्जुनने 3 विकेट्स पटकावले आहेत. गेल्या 3 वर्षांपासून आयपीएल डेब्यूच्या प्रतिक्षेत होता. त्यानंतर यंदा त्याला संधी मिळाली. त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष होतं. सचिन तेंडूलकरने देखील त्याला खास ट्रेनिंग दिली होती. अशातच आता आणखी एक स्टार किड्स आयपीएलमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.
इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विरेंद्र सेहवागचा (Virender Sehwag) मुलगा आर्यवीर सेहवाग त्याच्या वडिलांप्रमाणे फलंदाजी करत आहे. आर्यवीर सेहवागही वडिलांप्रमाणे क्रिकेट खेळायला शिकला आहे. व्हिडिओमध्ये आर्यवीर सेहवाग (Aaryavir Sehwag) नेट प्रॅक्टिस करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये आर्यवीर कव्हर ड्राईव्ह, पुल शॉट आणि बॅक फूट पंच खेळताना दिसतोय. त्यामुळे आता अर्जून तेंडूलकरनंतर सेहवागचा पठ्ठ्या आयपीएल डेब्यू करणार का? असा सवाल विचारला जात आहे.
आयपीएलचा मुख्य फायदा आहे की, आम्हाला लहान शहरांमधून तरुण खेळाडू उभे राहिले, या खेळाडूंनी उच्च पातळीवरील स्पर्धात्मकतेसह सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली, असं सेहवाग म्हणतो. आयपीएलमुळे देशातील लहान राज्यांतील अनेक मुलांनी क्रिकेटला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि त्यासाठी खूप प्रयत्न केलेत. माझा मुलगा 15 वर्षांचा आहे आणि तो आधीच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळण्यासाठी खूप मेहनत घेतोय, असंही सेहवागने (Aaryavir Virender Sehwag) सांगितलं होतं.
पाहा Video
दरम्यान, विरेंद्र सेहवागने त्याच्या कारकिर्दीत 104 आयपीएल सामने खेळले आणि 155.44 च्या स्ट्राइक-रेटने 2 शतके आणि 16 अर्धशतकांसह 2,728 धावा केल्या. 2013 पासून विरेंद्र सेहवाग क्रिकेटपासून लांब आहे. मात्र, तो क्रिकेटवर सतत भाष्य करताना दिसतो. अनेक खेळाडूंवर त्याने आपलं मत नेहमी मांडत असतो. तसेच अनेक तरुण खेळाडू त्याच्या हाताखाली ट्रेनिंग देखील घेत आहेत.