मुंबई : सध्या टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नातेसंबंधांची चर्चा रंगलीये. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सगळीकडे रंगली होती. दरम्यान अशातच आता त्या दोघांचा एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. मुंबई एयरपोर्टवर या दोघांना स्पॉट करण्यात आलं तेव्हाचा हा फोटो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटाच्या अफवा पसरल्यानंतर युझवेंद्र आणि धनश्री विमानतळावर एकत्र दिसले. काही दिवसांपूर्वी धनश्रीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून चहल आडनाव हटवलं होतं तर युझवेंद्रनेही नवीन आयुष्याबाबत एक पोस्ट शेअर केल्याने या जोडप्यामध्ये काही योग्य नसल्याचा अंदाज बांधला जात होता.


युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा मुंबई एयरपोर्टवर एकत्र दिसले. धनश्री वर्मा आपला पती युजवेंद्र चहलला एअरपोर्टवर सोडण्यासाठी पोहोचली होती. यावेळी धनश्रीने युझवेंद्रला मिठी मारली. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.



युजवेंद्र चहल आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाचा भाग असणार आहे. युझवेंद्र चहल या टूर्नामेंटसाठी दुबईला रवाना झाला. या दरम्यान धनश्री वर्माने युजवेंद्र चहलला सर्वांसमोर मिठी मारली. सध्या दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून त्यांच्यात काहीही बिनसलं नसल्याचा अंदाज बांधला जातोय. 


कपलचा मजेशीर व्हिडिओ


धनश्री-युझीने एका ट्रेंडिंग ऑडिओवर रिल केले आहे. ज्यात धनश्री म्हणते की, 'मी एका महिन्यासाठी माहेरी जाते. त्यावर  युझवेंद्रची प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे. तो हातातील रिमोट फेकतो आणि आपल्याच धुंदीत नाचायला लागतो आणि तो गाणे म्हणतो, 'तेरी इसी अदा पे सनम, मुझको तो प्यार आया' आणि तिचे गाल ओढतो.