मुंबई : आशिया कप २०१८ मध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं धुव्वा उडवला. पार्ट टाईम स्पिनर केदार जाधवनं शानदार बॉलिंग करत २३ रनमध्ये पाकिस्तानच्या ३ विकेट घेतल्या. केदार जाधव बरोबरच भुवनेश्वर कुमारनंही ३ विकेट घेतल्या. केदार जाधवच्या या बॉलिंगमुळे भारताचा या मॅचमध्ये विजय झाला. भारतीय बॉलरच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानची टीम १६२ रनवर ऑल आऊट झाली. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदनंही केदार जाधवमुळे आमचा पराभव झाल्याचं मान्य केलं. आम्ही २ स्पिनरसाठी तयार होतो पण तिसऱ्या स्पिनरनं आमचा खेळ बिघडवला, असं सरफराज म्हणाला. केदार जाधवनं चांगली बॉलिंग केली असली तरी भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-पाकिस्तानच्या या मुकाबल्यानंतर केदार जाधवच्या बॉलिंगवरून भाजप-काँग्रेस एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पनदनानं केदार जाधवच्या बॉलिंग ऍक्शनवरून भाजपवर निशाणा साधला. बॉलिंग करताना केदार जाधवचा हात खूप खाली जातो. पण रुपयाएवढा खाली जात नाही, असं ट्विट दिव्या स्पनदना यांनी केलं. यानंतर लगेचच भाजपच्या कर्नाटक ट्विटर हॅण्डलनं दिव्या स्पनदना यांना प्रत्युत्तर दिलं. केदार जाधवच्या बॉलिंग ऍक्शनबद्दल माहिती नाही पण तुमचा आयक्यू पाकिस्तान टीमच्या कामगिरीपेक्षा नक्कीच कमी आहे, असं ट्विट कर्नाटक भाजपनं केलं.



याआधीही स्पनदना यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला होता. इंग्लंडविरुद्ध रवींद्र जडेजानं ८६ रनचा सर्वाधिक स्कोअर केला होता. तेव्हा 'रवींद्र जडेजाच्या ८६ रन भारताचा दुसरा सर्वाधिक स्कोअर, ८७ रुपयाचं पेट्रोल पहिल्या क्रमांकावर' असं ट्विट स्पनदना यांनी केलं होतं.