मुंबई : मुंबई आणि पंजाबमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईचा विजय झाला. ६० बॉलमध्ये ९४ रन्सची तुफानी खेळी करुनही के.एल.राहुल आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. जसप्रीस बुमराहच्या शानदार ४ ओव्हरसमोर पंजाबच्या टीमला रोखून धरल.मुंबईच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत १८६ रन्सच आव्हान समोर ठरल. याच उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेली पंजाबची टीम १८३ रन्सच बनवू शकली. पण मॅच संपल्यानंतर के.एल.राहुल आपल्या टीमची जर्सी उतरवून मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसला.त्याच्या सोबत हार्दिक पांड्याही पंजाबच्या जर्सीमध्ये दिसला.


राहुलने सांगितल कारण 


मॅच संपल्यानंतर राहुलने याचे कारण सांगितले. 'आपण आतापर्यंत फुटबॉलमध्ये अशा प्रकारे प्रतिस्पर्ध्यांना जर्सी बदलताना पाहिलंय. आम्ही दोघ चांगले मित्र आहोत. फुटबॉलचा ट्रेंड आम्हाला क्रिकेटमध्ये आणायचाय' असे राहुल याने सांगितले. आम्ही याबद्दल याआधी कधी बोललो नव्हतो पण मॅचनंतर हार्दिकला माझी जर्सी हवी होती. त्यानंतर आम्ही एकमेकांची जर्सी घातल्याचेही त्याने सांगितले.