World Cup 2023 Final IND vs AUS : वर्ल्डकप फायनलमध्ये (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज विजेतेपदाचा मुकाबला होईल. अनबीटन टीम इंडिया फायनलमध्ये कांगारुंची शिकार करत वर्ल्डकप उंचावणार अशीच अपेक्षा आणि उत्साह प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन टीमने वर्ल्डकपमध्ये अडखळत सुरुवात केल्यानंतर दमदार कामगिरी करत फायनल गाठलीय. त्यामुळे दोन्ही संघाच्या कामगिरीकडे क्रिकेप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. यासोबत क्रिकेटप्रेमींचं दरवेळीप्रमाणे मैदानावरील प्रत्येक बारीक गोष्टींकडेही लक्ष असणार आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीव्ही प्रेझेंटर मयंती लँगरच्या (mayanti langer) बाबतीत एक गोष्ट शोधून काढल्यानंतर तिनेही प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरला वर्ल्डकपच्या सामन्यात तिच्या आउटफिटमुळे ट्रोल व्हावे लागले होते. भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनलनंतर मयंती लँगर दिग्गज सुनील गावसकर यांच्यासोबत चर्चा करत होती. या शोदरम्यान मयंतीने निळ्या स्कर्टसह ब्लेझर घातला होता, तर गावसकर यांनीही निळ्या रंगाची पँट घातली होती. लोकांचा असा समज झाला की, तो ब्लेझर सुनील गावसकर यांचा होता. ब्लेझरच्या बजेटवरून त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. आता मयंतीने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.


सोशल मीडियावर बरंच ट्रोल केल्यानंतर मयंतीने याबाबत भाष्य केले आहे. मयंती लँगरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती एक महिलेसोबत पूर्ण सूटमध्ये दिसत आहे. या फोटोसाठी जे कॅप्शन दिलंय त्यावरुन तरी असंच वाटतंय की तिने घातलेला सूट हा वर्ल्डकप फायनलसाठी असणार आहे. 'बजेटबाबत तुमची काळजी पाहून मी खूप प्रभावित झाले आहे. या चिंतेमुळेच मला असंख्य पोस्ट्समध्ये टॅग केले गेले आहे. घाबरू नका, आम्ही अंतिम सामन्यासाठी पूर्ण सूट खरेदी करू शकतो,' असे मयंती लँगरने म्हटलं आहे.



कोण आहे मयंती लँगर?


मयंती लँगर टिव्हीवरील स्पोर्टस् जर्नलिस्ट असून, तिने अनेक क्रिकेट आणि फुटबॉल सामन्यांचे सूत्रसंचालन केले आहे. क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीशी तिचे लग्न झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट सामने आणि मयांती लँगर हे समीकरण पक्क झालं आहे. आपल्या सदाबहार शैलीने अँकरिंग करत क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेणाऱ्या मयांतीचे अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. मयंती दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवीधर आहे. कॉलेजच्या दिवसांत ती स्वतः फुटबॉल संघाचा भाग होती.