मुंबई : चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या ११व्या हंगामात हैदराबादला अंतिम सामन्यात हरवत जेतेपद उंचावले. धोनीने हे जेतेपद जिंकत दाखवून दिले की जिंकण्यासाठी वयाचे बंधन नाही तर फिटनेस महत्त्वाचा आहे. चेन्नईने रविवारी वानखेडे स्टेडियमवर हैदराबादला हरवत तिसऱ्यांदा आयपीएलचा खिताब आपल्या नावे केला. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७८ धावा केल्या होत्या. चेन्नईने हे आव्हान १८.३ षटकांत पूर्ण केले. वॉटसनने जबरदस्त ११७ धावांची तडाखेबंद खेळी केली. 


फिटनेस महत्त्वाचा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल सुरु होण्याआधी धोनीच्या संघावर चहूबाजूंनी टीका झाली होती. धोनीच्या संघात म्हातारे खेळाडू असल्याची टीका त्यावर झाली होती. मात्र या जेतेपदाने धोनीने दाखवून दिले की वय हे केवळ आकडे आहेत. खेळाडू पूर्णपणे फिट असेल तर तो कोणतेही युद्ध जिंकू शकतो. आम्ही वयाबाबत अधिक बोलता मात्र त्याचबरोबर फिटनेसही महत्त्वाचा आहे. रायडू ३३ वर्षांचा आहे मात्र तो जर फॉर्मात असेल तर त्याचे वय महत्त्वाचे नाही. आम्हाला आमचे कमकुवत दुवे माहीत होते. जर वॉटसनने डाईव्ह करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला दुखापत झाली असती त्यामुळे त्याला हे न करण्यास सांगितले. वय हा केवळ आकडा आहे. मात्र तुम्ही पूर्णपणे फिट असला पाहिजेत.


हैदराबादनं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादनं २० ओव्हरमध्ये १७८/६ एवढा स्कोअर केला. या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार धोनीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करणाऱ्या हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनिंगला आलेला श्रीवत्स गोस्वामी स्कोअरबोर्डवर १३ रन असताना रन आऊट झाला. त्यानंतर शिखर धवन आणि हैदराबादचा कर्णधार केन विलियमसननं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण धवन २६ रनवर आऊट झाला. केन विलियमसननं ३६ बॉलमध्ये सर्वाधिक ४७ रन केल्या. तर युसुफ पठाणनं २५ बॉलमध्ये नाबाद ४५ रन केल्या. कार्लोस ब्रॅथवेटनं ११ बॉलमध्ये २१ रनची जलद खेळी केली. ब्रॅथवेट २० व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आऊट झाला. चेन्नईकडून एनगीडी, शार्दुल ठाकूर, करण शर्मा, ड्वॅन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १ विकेट मिळाली.