WTC 2023 Final Qualification: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. गुरुवारी या सिरीजचा चौथा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने या सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) दृष्टीने हा सामना टीम इंडियासाठी फार महत्त्वाचा मानला जातोय. 9 मार्चपासून हा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. तर टीम इंडियाच्या कामगिरीकडे चाहत्यांचं अधिक लक्ष असणार आहे.


WTC Final 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचं स्थान पक्कं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून टीम इंडिया 2-1 अशी आघाडीवर आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या टीमने या विजयासह फायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 68.52 पॉईंट्स झाले आहेत. 


अशातच आता फॅन्सच्या मनात एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे, उद्याची म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरूद्धची अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाली तर टीम इंडियाला फायनलच तिकीट कसं मिळणार? जर ऑस्ट्रेलियाविरूद्धची चौथी टेस्ट ड्रॉ झाली तर टीम इंडियासमोर मोठी अडचण येण्याची शक्यता आहे. 


चौथी टेस्ट ड्रॉ झाली तर?


मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथी टेस्ट ड्रॉ झाली तर भारताला श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीजच्या निर्णयावर अवलंबून रहावं लागणार आहे. जर न्यूझीलंडने ही सिरीज जिंकली किंवा ड्रॉ केली तर भारताला फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. टीम इंडियाची चांगली बाब एक म्हणजे, अहमदाबाद टेस्ट जरी ड्रॉ झाली किंवा ऑस्ट्रेलिया सामना जिंकली तरीही आपल्याला फायनलचं तिकीच मिळण्याची संधी आहे. 


श्रीलंका अजूनही फायनलच्या शर्यतीत


भारताव्यतिरिक्त श्रीलंकेच्या टीमला देखील अजूनही अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे. या महिन्यामध्ये टीमला न्यूझीलंडच्या भूमीवर 2 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळावायची आहे. श्रीलंकेने ही सिरीज 2-0 ने जिंकली तर त्यांना फायलनचं तिकीट मिळू शकणार आहे. मात्र न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये न्यूझीलंडच्या टीमचं पारडं जड मानलं जातंय.