Air hostess Records Video Of MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याचे व्हिडिओ (Viral Video) नेहमी व्हायरल होताना दिसतता. काही दिवसांपूर्वी तो रांचीच्या रस्त्यावर जुन्या गाड्या पळवताना दिसला होता. त्याचबरोबर त्याचा फ्लाईटमधील व्हिडिओ (Air hostess Video) तुफान व्हायरल झाला होता. त्यात तो कँडी क्रश गेम खेळताना दिसला. अशातच आता माहीचा आणखी एक व्हिडिओ (MS Dhoni Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. एका हवाईसुंदरीनं असं काही केलं की, व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचाही दिवस आनंदात जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला आवडता सेलिब्रिटी आपल्या समोर आल्यावर जो आनंद चेहऱ्यावर असतो, त्याला कोणतीच तोड नाही. त्यावेळी काय करावं, हे देखील सुचत नाही. अशीच काहीशी गत झाली ती एका एअर हॉस्ट्रेसची म्हणजेच हवाईसुंदरीची. कारण तिला प्रत्यक्षात दिसला माही...


चेन्नई सुपर किंग्जला (CSK) आयपीएल 2023 मध्ये पाचव्या आयपीएल विजेतेपदासाठी मार्गदर्शन केल्यानंतर भारताचा माजी महान महान एमएस धोनी सध्या खेळापासून दूर राहण्याचा आनंद घेत आहे. भारताचा माजी कर्णधार आयपीएलनंतर अनेक वेळा त्याच्या कुटुंबासह प्रवास करताना किंवा आनंद साजरा करताना दिसला आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात धोनी फ्लाइटमध्ये झोपताना दिसला होता. त्याचा व्हिडिओ एका हवाईसुंदरीने रेकॉर्ड केला. त्यावेळी तिचे हावभाव पाहा...


पाहा Video



धोनीने मनोरंजन क्षेत्रासह अनेक व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्याने धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचे स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलंय. ‘एलजीएम’ हा त्यांचा पहिला चित्रपट असेल. त्यामुळे आता धोनी व्यस्त असल्याचं दिसतंय. त्यामुळे त्याचे दौरे सुरू आहेत.


आणखी वाचा - निवृत्तीनंतर Stuart Broad ला आठवले Yuvraj Singh चे सहा सिक्स; म्हणतो, 'आजही तो दिवस माझ्यासाठी...'


दरम्यान, आता व्हायरल व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही लोकांनी व्हिडिओवर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक संतापल्याचं पहायला मिळंतय. एखाद्याची खासगी लाईफवर तुम्ही असं कसं करू शकता? त्यांना त्यांची प्रायवेट लाईफ आहे की नाही? असा सवाल आता नेटकरी उपस्थित करत आहेत.