नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज आशिया कप 2018 मधील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. याआधी उभयतांच्या झालेल्या सामन्यान भारताने पाकला जोरदार दणका दिला आहे. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानचा संघ आज मैदानात उतरेल. सध्या फॉर्मात असलेल्या भारताला हरवणं पाकिस्तानसाठी कठीणं दिसतयं.  या पाच गोष्टींमध्ये बदल न केल्यास त्यांना ते या सिरीजमध्ये तरी शक्य होणार नाही.


क्षेत्ररक्षण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्षेत्ररक्षण ही पाकिस्तानची कमजोरी आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये ते प्रकर्षाने दिसून आलं. मॅचच्या सुरूवातीलाच पाकिस्तानकडून पाच विकेट सुटल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तानचा स्कोअर बोर्ड 257 रन्सवर जाऊन पोहोचला होता.


कॅप्टन्स इनिंग 


पाकिस्तानचा कॅप्टन सरफराद अहमदला आपल्या खेळात सुधार करावा लागेल. त्याच्या कमजोर प्रदर्शनामुळे संघाच मनोबल खच्चीकरण होतं. सरफराजने अफगाणिस्ताविरुद्ध 12 तर भारताविरुद्ध 6 रन्सच बनवले. झिम्बॉम्बेविरुद्धच्या इनिंगमध्येही तो काही खास करु शकला नाही.


सुरुवातीची भागीदारी


ओपनिंग बॅट्समन्सने चांगली भागीदारी केल्याशिवाय पाकिस्तानचा स्कोअरबोर्ड पुढे जाणार नाही. फखर जमानकडुन पाकिस्तानला खूप आशा आहेत. पण त्याने आपल्या खेळाने सर्वांना नाराज केलंय.


दोघांवर मदार 


अफगाणिस्तानविरुद्ध शोएब मलिकने नाबाद 50 रन्स बनविले तर बाबर आजमने 66 रन्सची खेळी करत पाकला विजयी केलं होतं. हे प्रदर्शन भारताविरुद्ध त्यांना कायम ठेवावं लागेल.


मॅच प्रेशर 


पाकिस्तानी खेळाडू मॅच प्रेशर न झेलू शकल्याने भारताविरुद्ध हार पत्करावी लागल्याचे पाकच्या कोचने सांगितले होते. दबावामुळे पाकिस्तानी बॅट्समन्सनी खूप चूका केल्या आणि बाहेर जाणारे चेंडूही खेळण्याच्या नादात फसले.