मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जची काही खास सुरुवात झालेली दिसत नाही. 7व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 6 विकेट्सनी पराभव झाला. सीएसकेचा हा सलग दुसरा पराभव होता. चेन्नईच्या पराभवाला अनेकजण रवींद्र जडेजाला जबबादार धरत असून त्याला ट्रोल करण्यात येतंय. दरम्यान याबाबत आता माजी क्रिकेटर अजय जडेजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनीने लखनऊविरुद्धच्या शेवटची ओव्हर शिवम दुबेकडे दिली. दोन्ही टीमसाठी ही ओव्हर फार महत्त्वाची होती. पण या ओव्हरमध्ये दुबेने 25 रन्स दिले आणि चेन्नईचा पराभव झाला. या निर्णयामुळे धोनीवर सातत्याने टीका होतेय.


कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरही अजय जडेजाला धोनीची निर्णयक्षमता आवडली नाही. अजय जडेजा सामन्यानंतर म्हणाला, ''कधी कधी तुम्ही कमांड हातात घेता मी समजू शकतो. मी जडेजाची बाजू घेत नाही. पण जडेजा बाऊंड्रीजवळ उभा राहिला आणि धोनी सगळा खेळ चालवत राहिला. तो खूप मोठा खेळाडू आहे, असं बोलणं मला आवडत नाही, पण या सामन्यात जे काही झाले ते मला आवडले नाही." 


तो म्हणाला, "हे चुकीचं आहे, यात काही शंका नाही. माझ्यापेक्षा मोठा धोनीचा कोणी चाहता नाही. जर त्याने असं शेवटच्या सामन्यात हे केलं असतं तर समजण्यासारखं होतं."