वानखेडेच्या मैदानावर Ajinkya Rahane नावाचं वादळ; मराठमोळ्या रहाणेने मुंबईच्याच गोलंदाजांना झोडलं
चेन्नई सुपर किंग्जचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) मुंबई इंडियन्ससमोर तुफान फलंदाजी करत अर्धशतक ठोकलंय.
Ajinkya Rahane : मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात सामना होता. मुंबईचं वानखेडे मैदान म्हटलं की, मराठमोळ्या खेळाडूंसाठी मोठी गोष्ट असते. याचीच प्रतिची आजच्या सामन्यात आली. चेन्नई सुपर किंग्जचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) मुंबई इंडियन्ससमोर तुफान फलंदाजी करत अर्धशतक ठोकलंय.
यंदाच्या सिझनमधील सर्वात वेगवान अर्धशतक
अजिंक्य रहाणे चेन्नईकडून त्याचा पहिलाच सामना खेळतोय. मैदानात उतरताच अजिंक्यने तुफान फलंदाजीला सुरुवात केली. मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः त्याने चोपलं. अवघ्या 19 बॉल्समध्ये रहाणेने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्स लगावत उत्तम फलंदाजी केली. त्याच्या या खेळीने रहाणेचे चाहते मात्र फारच खूश झाले आहेत.
चेन्नईचा मुंबई इंडियन्सवर विजय
आजच्या सामन्याचा खरा हिरो ठरला तो अजिंक्य रहाणे. चेन्नईने 7 विकेट्सने मुंबईच्या टीमचा त्यांच्यात घरात पराभव केला. टॉस जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय सीएसकेसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने चेन्नईला 158 रन्सचं लक्ष्य दिलं. हे लक्ष्य अजिंक्य रहाणेच्या वेगवान फलंदाजीमुळे 18.1 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स राखून सुपर किंग्जने सहज गाठलं.
मराठमोठ्या खेळाडूंनीच मुंबईला धुतलं
रहाणेने आजच्या सामन्यात 225.93 च्या स्ट्राईक रेटने रन्स केले. तर रहाणेसोबत ऋतुराज गायकवाडने 36 बॉल्समध्ये नाबाद 40 रन्स केले. या दोन्ही मराठमोळ्या खेळाडूंनी मुंबईच्या गोलंदाजांना चांगलंच झोडपलं. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळालं आहे.