मुंबई : टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अफगानिस्तान विरुद्ध टेस्ट मॅच खेळणार आहे. टीम इंडिया आणि अफगानिस्तानमध्ये ही टेस्ट मॅच 14 जूनपासून बंगळुरुमध्ये खेळली जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्याला विराट कोहली मुकणार आहे. अफगानिस्तानविरुद्ध ही टेस्ट मॅच टीम इंडियासाठी आगामी इंग्लंड आणि आयरलँडच्या दौऱ्याआधी वॉर्म अप सारखी आहे. विराट ऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जूनमध्ये इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. यामुळे तो या मॅचला मुकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमचा टेस्ट स्पेशलिस्ट खेळाडू चेतेश्वर पुजारा सध्या यार्कशायरकडून काउंटी क्रिकेट खेळतो आहे. बंगलूरुमध्ये अफगानिस्तानच्या विरुद्ध होणाऱ्या या मॅचसाठी तो भारतात येणार आहे. अफगानिस्तान विरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांना देखील संधी मिळू शकते. 8 मेला टीमची घोषणा होणार आहे. यासाठी भारत ए टीमची घोषणा देखील होणार आहे. जी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर खेळणार आहे.


8 जूनला बंगलुरुमध्ये नॅशनल सिलेक्शन कमेटीची बैठक आहे. ज्यामध्ये 6 वेगवेगळ्या टीम इंडिया बनवल्या जाणार आहेत. यामध्ये अफगानिस्तान विरुद्ध, इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया 'ए' टीम, इंग्लंड 'ए' आणि वेस्टइंडिज 'ए' टीममध्ये ही सिरीज होणार आहे. विराट कोहलीचा शेवटचा काउंटी सामना 28 जूनला संपणार आहे. कर्णधार विराट कोहली टीमसोबत आयरलँडमध्ये पुन्हा सहभागी होईल. आयरलँडसोबत भारताला 2 टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर 3 टी-20 मॅच, 3 वनडे मॅच आणि 5 टेस्ट मॅच इंग्लंड विरुद्ध खेळायचे आहेत.


निडास ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला विजय मिळवून देणारा आणि आयपीएलमध्ये शानदार परफॉर्म करणारा दिनेश कार्तिक देखील या संघाचा भाग असू शकतो. महेंद्र सिंह धोनीच्या उपस्थितीत दिनेश कार्तिकला बॅट्समन म्हणून संधी दिली जाऊ शकते.