मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं लागोपाठ ४ अर्धशतक झळकावली. या चांगल्या कामगिरीनंतरही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 च्या सीरिजमधून अजिंक्य रहाणेला डच्चू देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 टीममध्ये स्थान न मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणेनं प्रतिक्रिया दिली आहे. वर्षभरामध्ये आम्ही एवढं क्रिकेट खेळतो. निवड समितीनं घेतलेल्या या निर्णयाचा मी आदर करतो. टीममध्ये स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो, असं रहाणे म्हणाला आहे.


मला संधी आणि जबाबदारी दिल्यानंतर केलेल्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यामध्येही मी लागोपाठ चार वनडेमध्ये अर्धशतकं झळकावली होती, अशी प्रतिक्रिया रहाणेनं दिली आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये अर्धशतकानंतर मी शतक करू शकलो असतो. या पुढच्या सीरिजमध्ये अर्धशतकानंतर शतक करण्यासाठी मी आग्रही असेन. रोहितबरोबर मी तीन १०० रन्सच्या पार्टनरशीप केल्याचं वक्तव्य अजिंक्यनं दिलं आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), हरदीप पंड्या, कुलदीप यादव, यजुवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल