अजिंक्य रहाणेच्या वडिलांना अटक आणि जामीन
टीम इंडियाचा टेस्ट टीमचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणे याच्या वडिलांना महाराष्ट्र पोलिसांनी आज अटक केली.
मुंबई : टीम इंडियाचा टेस्ट टीमचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणे याच्या वडिलांना महाराष्ट्र पोलिसांनी आज अटक केली.
एका कार अपघातात अजिंक्यचे वडील मधुकर बाबुराव रहाणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच त्यांना जामीन मंजूर झालात.
मधुकर रहाणे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीला धडकल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, गंभीर जखमी झाल्यानं महिलेनं रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. ६७ वर्षीय या महिलेचं नाव आशा कांबळे असं होतं.
कोल्हापूर नॅशनल हायवेवर स्थित कागल बस स्टेशनजवळ रस्ता ओलांडताना कांबळे यांचा अपघात झाला होता.
ही गाडी नक्की कोण चालवत होतं? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कोल्हापूर पोलिसांनी आईपीसी च्या कलम 304A, 337, 338, 279 आणि 184 नुसार तक्रार दाखल केलीय.