मुंबई : मुंबईविरुद्धच्या करो या मरो मॅचमध्ये राजस्थाननं मुंबईचा ७ विकेटनं पराभव केला. पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं राजस्थानसमोर १६९ रनचं आव्हान ठेवलं. राजस्थाननं हे आव्हान १८ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. राजस्थानच्या या विजयामुळे मुंबईचं प्ले ऑफला जाण्याचं आव्हान आणखी खडतर झालं आहे. तर राजस्थान मात्र अजूनही प्ले ऑफला क्वालिफाय व्हायच्या शर्यतीत कायम आहे. या मॅचमध्ये बटलरनं ५३ बॉलमध्ये ९४ रनची खेळी केली. यामध्ये ९ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. या धडाकेबाज खेळीमुळे बटलरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.


अजिंक्य रहाणेला धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईविरुद्धची मॅच जिंकली तरी राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला धक्का बसला आहे. मॅचमध्ये ओव्हर उशीरा संपवल्यामुळे रहाणेला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


कोहलीलाही झाली होती शिक्षा


याआधी ओव्हर उशीरा संपल्यामुळे विराट कोहलीलाही अशाच प्रकारे १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूनं ओव्हर धीम्या गतीनं टाकल्यामुळे कोहलीवर कारवाई झाली होती.