मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारतानं ४४३ रनवर इनिंग घोषित केली. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ८/० असा होता. भारताकडून चेतेश्वर पुजारानं शतक केलं, तर कर्णधार विराट कोहलीनं ८२ रनची खेळी केली. रोहित शर्मा ६३ रनवर नाबाद राहिला. या मॅचमध्ये भारताचा शतकवीर चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यामध्ये अनोखी स्पर्धा पाहायला मिळाली. ही स्पर्धा होती नॅथन लायनला विकेट न देण्याची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचआधी नॅथन लायननं पुजारा आणि रहाणेला प्रत्येकी ८-८ वेळा आऊट केलं होतं. लायनकडे या मॅचमध्ये सर्वाधिक वेळा भारतीय खेळाडूची विकेट घेणारा बॉलर व्हायची संधी होती. अखेर अजिंक्य रहाणेनं नॅथन लायनला ही संधी दिली. नॅथन लायननं त्याच्या ४०व्या ओव्हरला अजिंक्य रहाणेची विकेट घेतली. आता अजिंक्य रहाणे ९ वेळा लायनची शिकार झाला आहे. याचबरोबर लायन भारतीय खेळाडूची सर्वाधिक वेळा विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा बॉलर ठरला आहे. आर. लिंडवाल यांनी ८ वेळा विनू मंकड यांची विकेट घेतली होती.



नॅथन लायन हा भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. लायननं भारताविरुद्ध १७ टेस्ट मॅचमध्ये ३१.३७ च्या सरासरीनं आणि ३.२७ च्या इकोनॉमीनं ८१ विकेट घेतल्या आहेत. तर टेस्ट कारकिर्दीमध्ये लायननं ८३ मॅचमध्ये ३३५ विकेट घेतल्या आहेत.