लंडन : टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत. १ ऑगस्टपासून या सीरिजची पहिली टेस्ट खेळवण्यात येणार आहे. या सीरिजआधी भारताचा बॅट्समन अजिंक्य रहाणेनं माध्यमांशी संवाद साधला. इंग्लंडमधल्या वातावरणात बॉलरना मदत मिळते पण याचा अर्थ बॉलरना सोपं होतं असा नाही. इथल्या वातावरणामध्ये बॉलरना संयमानं एकाच ठिकाणी बॉलिंग करावी लागते. तसंच स्वत:च्या कौशल्याला पाठिंबा द्यावा लागतो. दोन्ही बाजूनं विकेट घेण्यापेक्षा एका बॉलरनं दुसऱ्या बॉलरला पाठिंबा दिला तर एका बाजूनं विकेट येऊ शकतात, असं रहाणेला वाटतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमध्ये येऊन आपण २० विकेट घेऊ शकतो हे सिद्ध करण्याची भारतीय बॉलरना चांगली संधी आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही भारतीय बॉलर २० विकेट घेतील अशी अपेक्षा केलेली नव्हती. त्यामुळे भारतीय बॉलरनी अजिबात दबाव घेऊ नये तसंच आपली बॉलिंग जगातली सर्वोत्तम असल्याचा विश्वास बॉलरनी ठेवला पाहिजे, असं वक्तव्य अजिंक्य रहाणेनं केलं आहे.