`हा` मुंबईकर करणार KKR चं नेतृत्व? ऑक्शनमध्ये Unsold होता होता राहिला..
IPL 2025 : यंदाच्या ऑक्शनचा भाग असलेले अनेक दिग्गज स्टार क्रिकेटर्स अनसोल्ड राहिले; त्यात केन विल्यम्सन, डेविड वॉर्नर, शार्दुल ठाकूर अशा अनेक खेळाडूंचा सहभाग होता. मात्र यातील एक दिग्गज खेळाडू ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता होता वाचला.
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पाडलं. या ऑक्शनमध्ये 577 खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर केवळ 182 खेळाडूंना फ्रेंचायझींनी खरेदी करून आपल्या संघात घेतलं. तर उर्वरित खेळाडू हे अनसोल्ड ठरले. यंदाच्या ऑक्शनचा भाग असलेले अनेक दिग्गज स्टार क्रिकेटर्स अनसोल्ड राहिले; त्यात केन विल्यम्सन, डेविड वॉर्नर, शार्दुल ठाकूर अशा अनेक खेळाडूंचा सहभाग होता. मात्र यातील एक दिग्गज खेळाडू ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता होता वाचला. त्याला शाहरुखच्या केकेआर संघाने शेवटच्या क्षणी अवघ्या 1.5 कोटींच्या बेस प्राईजवर विकत घेतले. मात्र आता त्याच खेळाडूच्या खांद्यावर आयपीएल 2025 साठी संघाचं नेतृत्व सोपवण्याचा विचार कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) आहे.
टीम इंडियाच्या कर्णधारपदाचाही अनुभव :
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2025 मध्ये संघाचं कर्णधारपद मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) सोपवणार असल्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणेने यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व केलं होतं, तसेच अजिंक्यच्या गाठीशी टीम इंडियाच्या टेस्ट संघाचं नेतृत्व करण्याचा देखील अनुभव आहे. अजिंक्य रहाणे याने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. अजिंक्य रहाणे याने आयपीएलमध्ये 2 शतके आणि 30 अर्धशतकेही झळकावली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च आयपीएल धावसंख्या 105* धावा अशी होती.
हेही वाचा : ज्युनिअर हिटमॅनचं नाव आलं समोर! रोहित-रितिकाच्या मुलाचं नाव पाहिलं का? जाणून घ्या त्याचा अर्थ
ऑक्शनमध्ये Unsold होता होता राहिला अजिंक्य :
मागील 2 वर्षांपासून अजिंक्य रहाणे हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळत होता. मात्र यंदा चेन्नईने त्याला रिटेन केलं नाही आणि परिणामी त्याला ऑक्शनमध्ये यावं लागलं. अजिंक्यने ऑक्शनमध्ये स्वतःची बेस प्राईज ही 1.5 कोटी इतकी ठेवली होती. मात्र तरी देखील पहिल्या राउंडमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. ऑक्शन संपायला शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना शाहरुख खानच्या केकेआरने दुसऱ्या राउंडमध्ये अजिंक्यला बेस प्राईजवर खरेदी केले. अजिंक्य रहाणे यापूर्वी देखील केकेआर संघाचा भाग होता. आयपीएल 2022 मध्ये तो केकेआरकडून खेळला मात्र त्याने संपूर्ण सीजनमध्ये केवळ 133 धावा केल्या म्हणून केकेआरने त्याला रिलिज केले होते.
आयपीएल 2025 चं विजेतेपद केकेआरने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जिंकलं होतं. मात्र केकेआरने त्याला रिटेन केलं नाही आणि ऑक्शनमध्ये पंजाबने अय्यरसाठी तब्बल 26.75 कोटी मोजून खरेदी केले. त्यामुळे केकेआरचा पुढचा कर्णधार कोण असणार याविषयी चर्चा क्रीडा विश्वात होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार आयपीएल 2025 मध्ये केकेआरच्या कर्णधार पदासाठी अजिंक्य रहाणे हा मजबूत दावेदार असून कर्णधार म्हणून त्याच्या नावाचा विचार कोलकाता नाईट रायडर्सकडून केला जात आहे.