`या` बाबतीत आगरकर आहे भारतातील सर्वात बेस्ट बॉलर
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अजित आगरकर याने धोनीवर टिप्पणी केल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अजित आगरकर याने धोनीवर टिप्पणी केल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.
महेंद्रसिंग धोनी याने टी-२० फॉरमॅटमधून बाहेर पडण्याची गरज असल्याचं मतं आगरकरने व्यक्त केलं होतं. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी आगरकरवर टीकेची झोड उठवली होती.
आगरकर आणि धोनी यांची तुलना होऊ शकत नाही. मात्र, आगरकरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत असं काही योगदान दिलं आहे ज्यामुळे आगरकरचं नाव अद्यापही घेतलं जातं.
आगरकरने भारतीय टीमकडून खेळताना सर्वात कमी वन-डे मॅचेसमध्ये ५० विकेट्स पूर्ण केले आहेत. अजित आगरकरने आपल्या २३व्या वन-डे मॅचमध्येच आपले ५० विकेट्स पूर्ण केले होते.
भारताकडून सर्वात कमी वन-डे मॅचेसमध्ये ५० विकेट्स घेणारा आगरकर हा एकमेव बॉलर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकच बॉलर असा आहे ज्याने आगरकरपेक्षा कमी वन-डे मॅचेसमध्ये ५० विकेट्स घेतले आहेत. श्रीलंकेच्या मेंडिसने १९ वन-डे मॅचेसमध्ये ५० विकेट्स घेतले होते.
आगरकरने आणि न्यूझीलंडच्या मिचेल मॅक्लेंघन यांनी २३ मॅचेसमध्ये ५० विकेट्स घेतले आहेत. विशेष म्हणजे ५० विकेट्स घेण्याच्या बाबतीत डेनिस लिली, शेन वॉर्न, वकार यूनुस आणि सकलैन मुश्ताक हे आगरकरच्या मागे आहेत.