नवी दिल्ली: ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत भारताची स्टार बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधुला मोठं यश मिळालं आहे. सिंधु वुमन्स सिंगल्सच्या गटात सेमीफायनमध्ये पोहोचली आहे. सिंधुच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपांत्यपूर्व फेरीत जगातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या जपाच्या स्पर्धकासोबत सिंधुचा सामना झाला. या सामन्यात जपानच्या अकेने यामागुचीचा 16-21, 21-16, 21-19 असा पराभव केला. हा सामना जवळपास 76 मिनिटं खेळला गेला. 


आता सिंधुची कसोटी थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगसोबत होणार आहे. या खेळाडूचा जगात 11वा क्रमांक आहे. 25 वर्षांची सिंधु आपल्या या कारकीर्दीत दुसऱ्यांदा सेमीफायनलपर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी 2018मध्ये ती अंतिम 4पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर मात्र सिंधुला पराभव स्वीकारवा लागला होता. यावेळी पुन्हा एकदा ही संधी मिळाली आहे. त्यामुळे सिंधु या संधीचं सोनं करेल अशी आशा सर्वांनाच आहे.


भारत-इंग्लंड निर्णायक लढत आज, हे 2 खेळाडू संघामधून बाहेर?


रिओ ऑलिम्पिक 2019ची रौप्यपदक विजेती सिंधू आजवर ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवू शकली नाही. त्यामुळे, या वेळी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी सिंधु सज्ज आहे.