All England Open Badminton Championships: सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा! सेमीफायनलमध्ये अपयश
पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यफेरीत पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई: पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यफेरीत पराभव स्वीकारावा लागला. शनिवारी महिला एकेरीत थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगविरुद्ध तिला पराभवाला सामोरं जावं लागलं.
सिंधूला तिच्यापेक्षा युवा आणि जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकाची खेळाडू चोचुवोंगच्या चपळ आणि अचुकतेची बरोबरी साधता आली नाही. 43 मिनिटे रंगलेल्या या लढतीत सिंधूला 17-21, 9-21 ने पराभव स्वीकारावा लागला.
याआधी उपांत्यपूर्व फेरीत जगातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या जपाच्या स्पर्धकासोबत सिंधुचा सामना झाला. या सामन्यात जपानच्या अकेने यामागुचीचा 16-21, 21-16, 21-19 असा पराभव केला. हा सामना जवळपास 76 मिनिटं खेळला गेला होता.
इंग्लंडच्या बर्मिंघम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय बॅटमिंटनपटूंना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. शुक्रवारी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लक्ष्य सेनचा पराभव झाला. सामना 55 मिनिटं सुरू होता. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा पराभव झाला आहे.