विराट कोहली, मीराबाई चानूसह ‘या’ खेळाडूंचाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली होती.
मुंबई: मंगळवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काही खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू या दोन खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विराट आणि मीराबाई यांच्याव्यतिरिक्त आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजवणाऱ्या नीरज चोप्रा, हिमा दास यांनाही यावेळी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
ही आहे यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची यादी
राजीव गांधी खेलरत्न-
विराट कोहली (क्रिकेट)
मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)
अर्जुन पुरस्कार-
नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स)
जिंसन जॉन्सन (अॅथलेटिक्स)
हिमा दास (अॅथलेटिक्स)
एन.सिक्की रेड्डी (बॅडमिंटन)
सतीश कुमार (बॉक्सिंग)
स्मृती मंधाना (क्रिकेट)
शुभंकर शर्मा (गोल्फ)
मनप्रीत सिंग (हॉकी)
सविता (हॉकी)
कर्नल रवी राठोड (पोलो)
राही सरनोबत (शूटिंग)
अंकुर मित्तल (शूटिंग)
श्रेयसी सिंग (शूटिंग)
मनिका बत्रा (टेबल टेनिस)
जी. सथियन (टेबल टेनिस)
रोहन बोपन्ना (टेनिस)
सुमीत (कुस्ती)
पूजा कडियन (वुशू)
अंकुर धामा (पॅरा अॅथलेटिक्स)
मनोज सरकार (पॅरा बॅडमिंटन)
द्रोणाचार्य पुरस्कार-
अचैय्या कट्टप्पा (बॉक्सिंग)
विजय शर्मा (वेटलिफ्टिंग)
ए. श्रीनिवास राव (टेबल टेनिस)
सुखदेव सिंह पन्नू (अॅथलेटिक्स)
क्लॅरेन्स लोबो (हॉकी जीवनगौरव)
तारक सिन्हा (क्रिकेट जीवनगौरव)
जीवन कुमरा शर्मा (ज्युडो जीवनगौरव)
वी.र. बीडू (अॅथलेटिक्स जीवनगौरव)
ध्यानचंद पुरस्कार-
सत्यदेव प्रसाद
भारत कुमार छेत्री
बॉबी अलोयस्युस
दादू दत्तात्रय चौगुले