हैदराबाद : अंबाती रायुडू आणि अजहरुद्दीन यांच्यामधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. अजहरुद्दीन हा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप रायुडूने केला होता. यानंतर अजहरने रायुडूला प्रत्युत्तर दिलं. अंबाती रायुडू हा वैफल्यग्रस्त क्रिकेटपटू असल्याचं अजहर म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजहरच्या या टीकेला रायुडूने प्रत्युत्तर दिलं आहे. हैदराबाद क्रिकेटमधला भ्रष्टाचार स्वच्छ करण्याकडे लक्ष घाल, असा सल्ला रायुडूने अजहरला दिला आहे. 'हा वैयक्तिक मुद्दा बनवू नकोस. आपल्या दोघांपेक्षा हा मुद्दा मोठा आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये काय चाललं आहे, ते आपल्या दोघांना माहिती आहे. हा भ्रष्टाचार मिटवण्याची तुला संधी आहे. इथल्या बदमाश लोकांपासून स्वत:ला वेगळं कर. अनेक क्रिकेटपटूंचं भविष्य तू वाचवशील,' असं ट्विट रायुडूने केलं आहे.




हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार असल्यामुळे आपण रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादकडून न खेळण्याचा निर्णय घेतला होता. तेलंगणाचे मंत्री केटी रामा राव यांनाही रायुडूने ट्विटरवर टॅग केलं होतं. 'केटी रामा राव नमस्कार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधल्या भ्रष्टाचारावर लक्ष घाला. क्रिकेट टीम पैसे आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांनी प्रभावित असेल तर हैदराबाद सर्वोत्तम टीम कशी होईल? अनेक लोकांवर एसीबीच्या केस दाखल आहेत, पण हे सगळं लपवण्यात येत आहे,' असं रायुडू म्हणाला होता.