मुंबई : क्रिकेट विश्वचषक संघात निवड न झाल्यानं निराशेमध्ये निवृत्तीची घोषणा केलेला क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत त्यानं हैदराबाद क्रिकेट संघटनेला पत्राद्वारे आपण निवृत्ती मागे घेत असून आपल्यात अजून खूप क्रिकेट शिल्लक असल्याचं म्हटलं आहे. क्रिकेटच्या सर्व स्वरुपात पुन्हा खेळण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे. निवृत्तीचा निर्णय आपण भावनेच्या भरात घेतला असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कठीण काळात चेन्नई संघ, व्ही.व्ही.लक्ष्मण आणि नोएल डेविड यांनी आपल्याला खूप पाठिंबा दिला असल्यानं त्यानं म्हटंल असून त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत. 



रायुडूला वर्ल्डकपमध्ये राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं होतं. शिखर धवन आणि विजय शंकरला दुखापत झाल्यानंतर ही त्याला संघात स्थान न दिल्याने तो निराश झाला होता. ऋषभ पंत आणि मयंक अग्रवालला त्यांच्या जागी घेण्यात आलं. पण रायुडूला मैदानात खेळण्याची संधी न दिल्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.


रायुडूने भारतासाठी एकूण 55 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 1,694 रन केले आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोर नाबाद 124 रन आहे. त्याने 3 शतक आणि 10 अर्धशतक देखील ठोकले आहेत. 6 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 42 रन केले आहेत. 97 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये त्याने 6,151 रन केले आहेत.