Amit Mishra Reaction On Twitter: आशिया कप 2022 स्पर्धेतून भारताचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी सोशल मीडियावर दोन्ही देशांचे चाहते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू अमित मिश्राने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. अफगाणिस्तानने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तानला पराभूत केले तर ते संपूर्ण आठवडा अफगाण चाप खाईन, असं लिहिलं होतं. पण या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि पाकिस्तानी अभिनेत्रीने अमित मिश्राला ट्रोल केलं. त्यावर अमित मिश्राने असं प्रत्युत्तर दिलं की तिचं तोंड बंद झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिनं अमित मिश्राच्या ट्वीटवर उत्तर देताना लिहिलं होतं की, 'आता अमित मिश्राला पूर्ण आठवडा गायीचं शेण खावं लागेल.' यावर अमित मिश्राने आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे शिनवारीला तोंड बंद करून गप्प बसावं लागलं आहे. अमित मिश्राने लिहिलं की, "माझा पाकिस्तानात येण्याची जराही इच्छा नाही." हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 




पाकिस्ताननं अफगाणिस्तानला पराभूत केल्याने आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरी गाठण्याचं भारताचे स्वप्न भंगलं आहे आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला रोखण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. पण सामन्याच्या शेवटच्या षटकात नसीम शाहच्या सलग दोन षटकारांनी पाकिस्ताननं विजय खेचून आणला.