आंद्रे रसेलची तुफानी खेळी, मोडला युवराजचा रेकॉर्ड
रसेल चेन्नईच्या गोलंदाजांवर तुटून पडला
मुंबई : चेन्नई आणि कोलकातामध्ये एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाताचा ऑलराउंडर आंद्रे रसेलने षटकारांचा पाऊस पाडला. फक्त 36 बॉलमध्ये त्याने 88 रन ठोकले. रसेलने त्य़ाच्या या तुफाणी खेळीत 11 सिक्स ठोकले. असं करत त्याने युवराज सिंग, अॅडम गिलक्रिस्ट आणि मुरली विजयचा रेकॉर्ड मोडला आहे. रसेल चेन्नईच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला होता. या इनिंगमध्ये त्याने फक्त 1 फोर मारला.
रसेलची तुफानी खेळी
रसेलने 244 च्या स्ट्राइक रेटने रन केले. एक इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा क्रिस गेलचा रेकॉर्ड आहे. गेलने 2013 मध्ये पुणे संघाच्या विरोधात 66 बॉलमध्ये 175 रन केले होते. ज्यामध्ये त्याने 17 सिक्स ठोकले होते. क्रिस गेलची स्ट्राईक रेट होती 265. यानंतर ब्रँडन मॅक्कुलमने 2008 मध्ये पहिल्यास सामन्यात 158 रन ठोकले होते. मॅक्कुलमने या इनिंगमध्ये 13 सिक्स ठोकले होते. यानंतर क्रिस गेल (13), एबी डिविलियर्स (12), क्रिस गेल (12) यांच्या नावावर इतके सिक्स आहेत.
युवराजचा रेकॉर्ड मोडला
युवराज सिंगने देखील दिल्ली विरोधात 29 बॉलमध्ये 68 रन केले होते. तेव्हा त्याने 9 सिक्स ठोकले होते. अॅडम गिलक्रिस्टने 10, मुरली विजयने 11 तर सनथ जयसूर्याने 11 सिक्स ठोकले आहेत.