Angelo Mathews: मॅथ्यूजची `ती` विकेट योग्य की अयोग्य? अखेर MCC ने केलं स्पष्ट
Angelo Mathews time out controversy: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाईम आऊटद्वारे अँजेलो मॅथ्यूजची विकेट गेली. दरम्यान या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. यावरून विरोधी टीमचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खेळ भावनेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या सर्वांमध्ये आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
Angelo Mathews time out controversy: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मोठी घटना पहायला मिळाली ती श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूजच्या विकेटची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाईम आऊटद्वारे अँजेलो मॅथ्यूजची विकेट गेली. दरम्यान या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. यावरून विरोधी टीमचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खेळ भावनेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या सर्वांमध्ये आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
एमसीसीने निवेदन जारी केले
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने शनिवारी त्यांच्या निवेदनात म्हटलंय की, वर्ल्डकपच्या सामन्यात अंपायरने अँजेलो मॅथ्यूजला योग्य रितीने 'टाईम आऊट' दिलं होतं. पण नवीन हेल्मेट मागण्यापूर्वी अंपायरचा सल्ला घेऊन मॅथ्यूजला अशी विकेट गमावणं टाळता आलं असतं.
मॅथ्यूज बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेळेच्या मर्यादेत पुढचा बॉल खेळण्यासाठी येऊ शकला नाही. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'टाईम आऊट' झालेला पहिला फलंदाज ठरला. मॅथ्यूजला हेल्मेटचा पट्टा तुटल्याचं लक्षात आल्याने आणि नवीन हेल्मेट मागवलं. याचवेळी बांगलादेशने टाईम आऊटसाठी अपील करत त्याची विकेट काढली.
टाईम आऊट पासून वाचू शकत होता अँजेलो
एमसीसीने निवेदनात असंही म्हटलंय की, 'जेव्हा हेल्मेट तुटलं तेव्हा मॅथ्यूजने अंपायरचा सल्ला न घेतल्याचं दिसून आलं. नवीन गोष्ट ऑर्डर करण्यापूर्वी खेळाडूने अंपायरशी चर्चा करणं आवश्यक आहे. यावेळी मॅथ्यूजने सरळ ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवलं. जर त्याने अंपायरला घडलेला प्रकार सांगितला असता आणि वेळ मागितला असता तर त्याला हेल्मेट बदलण्याची परवानगी मिळाली असती. अशाने तो टाईम आऊट होण्यापासून वाचू शकला असता.
अंपायरने दिला योग्य निकाल
एमसीसीने जारी केलेल्या निवेदनात अंपायरचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं गेलंय. निवेदनात म्हटल्यानुसार, '2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला होता, त्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित करणं हे योग्यच आहे. असा नियम आवश्यक आहे कारण, विकेट पडल्यास फलंदाज वेळ वाया घालवू शकतात. परिणामी यामुळे फिल्डींग करणाऱ्या टीमला स्लो ओव्हर रेटसाठी दंड भरावा लागू शकतो.