SL vs BAN: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाला Time Out, `या` चुकीमुळे Angelo Matthews ला दाखवला बाहेरचा रस्ता
Angelo Mathews Timed Out : दिल्लीच्या अरूण जेठली मैदानात खेळल्या जात असलेल्या श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यातील सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडली. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज याला पहिल्यांदा टाईम आऊट देण्यात आला. नेमकं काय झालं पाहा...
SL vs BAN, Angelo Matthews TIME OUT : बांगलादेश आणि श्रीलंका (Bangladesh vs Sri Lanka) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका खेळाडूला टाईम आऊट (Timed Out) देण्यात आला. दिल्लीच्या अरूण जेठली मैदानात ही घटना घडली. ही घटना श्रीलंकेच्या डावाच्या 25 व्या षटकात घडली. शाकिबने दुसऱ्याच चेंडूवर सदीरा समरविक्रमाला झेलबाद केले. यानंतर अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) पुढचा फलंदाज म्हणून क्रीजवर आला. मात्र, यावेळी जरा गडबड झाली. मॅथ्यूजला मैदानात येताना योग्य हेल्मेट आणता आलं नाही. त्यामुळे त्याने रिझर्व खेळाडूंना हेल्टेम आणण्याचा इशारा केला. यादरम्यान बांगलादेशचा कॅप्टन शाकिब-अल-हसन (Shakib Al Hasan) याने मैदानावरील पंचांकडून 'टाइम आऊट'चं आवाहन केलं.
सुरूवातीला शाकिब मस्करी करतोय, असं सर्वांना वाटलं. पण, शाकिबचं अपिल पाहून पंचांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. दोन्ही पंचांनी मैदानात चर्चा केली अन् मॅथ्यूजला 'टाइम आऊट' देण्यात आलं. नेमकं काय झालं? याचं कारण देखील अनेकांना कळालं नाही. मात्र, शाकिबने एकाच डावात दोन पक्षी मारले (एकाच बॉलमध्ये दोन विकेट्स काढले). आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूचा अशाप्रकारे 'टाइमआऊट' होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पाहा Video
'टाइम आउट' नियम आहे तरी काय?
40.1.1 नुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, नवीन फलंदाज 3 मिनिटांच्या आत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. वर्ल्ड कपसाठी ही मर्यादा 2 मिनिटांची आहे. नवीन फलंदाज तसे करू शकला नाही तर त्याला बाद घोषित केले जाते. याला 'टाइम आउट' म्हणतात.
४०.१.२ नुसार, या निर्धारित वेळेत (३ मिनिटे) नवीन फलंदाज पूर्णतयारीने खेळपट्टीवर आला नाही, तर पंच नियम १६.३ (अंपायर्सद्वारे मॅचचा पुरस्कार) ची प्रक्रिया पाळतील. परिणामी, वरील नियमाप्रमाणेच फलंदाजाला 'टाइम आऊट' घोषित केले जाईल.
श्रीलंकेचा संघ - पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका.
बांगलादेश संघ - तन्झिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (WK), महमुदुल्ला, शकिब अल हसन (C), तौहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम.